Rohit Thinks
Monday, 31 December 2012
Wednesday, 26 September 2012
माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?
माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?
जीवनाच्या वाटेवर जीवनभर साथ देशील का?
माझ्या मनाच्या कोपऱ्यात
नयनांच्या माझ्या पापण्यात
थोडा वेळ विसावशील का ?
माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?
तुझ्या एका नजरे साठी
असतो सदा तुजपाठी
मज भरकटलेल्या
जीवन मार्गावर आणशील का?
माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?
एकच ध्येय माझ्या जगण्याचे
तुला माझी झालेली बघण्याचे
करण्या मज इच्छापूर्ती
तू पुढे येशील का?
माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?
तुझ्यात असतो मी गंभीर
करतेस मज तू अधीर
शेवटचे मागणे ..
हाती हात देशील का?
माझ्या मनातील प्रेम भावना तू समजून घेशील का ?

I LOVE YOU SO MUCH SWEETHEART .........!!
विचारीन विचारीन म्हणतोय, पण धाडस होत नाही ...
ती समोरून आली तरीही
शब्दाना बांध फुटत
नाही ,
विचारीन विचारीन म्हणतोय, पण
धाडस होत नाही ...
वर्षे लोटली तरी फ़क्त
तिच्यावरच मरतोय ,
शप्पथ सांगतो फ़क्त तिचाच
विचार करतोय ...
पेन मागण्याशिवाय कधी बोललो
नाही ,
विचारीन विचारीन म्हणतोय, पण
धाडस होत नाही ...
माहित नाही, ती मरते
का नाही माझ्यावर?
का तीचं ह्रदय
आहे, फ़क्त एक
"सजीव कलेवर" ?
चांदण्यात फिरण्याचा आनंद आम्हालाही
मिळणार की नाही ?
विचारीन विचारीन म्हणतोय, पण
धाडस होत नाही ...
Valentine Day ला
बूके घ्यायला जातोय
,
खिशाचा विचार करून फुलावरच
भागवतोय ,
या "गरिबाच प्रेम" ती
स्वीकारणार की नाही ?
विचारीन विचारीन म्हणतोय, पण
धाडस होत नाही ...
तिच्यासाठी
घेतलेल फुल वहितच
कोमेजतय ,
माझ काळीज मात्र तिचीच
आस धरतय ...
कितीही ठरवून गेलो तरी, ह्रदय मात्र बोलत नाही ,
विचारीन विचारीन म्हणतोय, पण
धाडस होत नाही ...
वाटतय, तिच्याही वहित असेल
एखादं फुल माझ्यासाठी
,
का आहे ही
भोळी समज या
वेड्या मनासाठी ?
आयुष्यातल पहिल - वहिल प्रेम
मिळणार की नाही ?
विचारीन विचारीन म्हणतोय, पण
धाडस होत नाही ...
आयुष्यात प्रेम करायचय मला ........
दूर कुठेतरी समुद्रकिनारी
हातात हात घालुन बसायचय मला,
आकाशातील तारकांकडे बघताना
भविष्याचे हितगुज करायचय मला,
आयुष्यात प्रेम करायचय मला.......
तिच्यासोबत थोड दुष्टपणे वागुन
तिला रागाने लालबुंद करायचय मला
तिची आसवें पुसता पुसता पटकन मिठीत घ्यायचय तिला
आयुष्यात प्रेम करायचय मला......
आयुष्यातील हिमालय
तिच्या बरोबरीने चढायचाय मला
शिखरावर पोहोचताना माझ्या सोबतीच आनंद
तिच्या डोळ्यातुन व्यक्त झालेला अनुभवायचाय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला.......
ती माझ्यापासुन दुर जात असताना
विरहाच्या कल्पनेने खिन्न व्हायचय मला
ती नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांना
डोळ्यावाटे मुक्त करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला......
हातात हात घालुन बसायचय मला,
आकाशातील तारकांकडे बघताना
भविष्याचे हितगुज करायचय मला,
आयुष्यात प्रेम करायचय मला.......
माझ्या मांडीवर डोक ठेऊन
तिला झोपी गेलेल पहायचय मला,
तिच्या शांत चेहऱ्याकडे पहाताना
स्वतःशी स्मित करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला...
तिला झोपी गेलेल पहायचय मला,
तिच्या शांत चेहऱ्याकडे पहाताना
स्वतःशी स्मित करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला...
तिच्यासोबत थोड दुष्टपणे वागुन
तिला रागाने लालबुंद करायचय मला
तिची आसवें पुसता पुसता पटकन मिठीत घ्यायचय तिला
आयुष्यात प्रेम करायचय मला......
आयुष्यातील हिमालय
तिच्या बरोबरीने चढायचाय मला
शिखरावर पोहोचताना माझ्या सोबतीच आनंद
तिच्या डोळ्यातुन व्यक्त झालेला अनुभवायचाय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला.......
ती माझ्यापासुन दुर जात असताना
विरहाच्या कल्पनेने खिन्न व्हायचय मला
ती नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांना
डोळ्यावाटे मुक्त करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला......
Saturday, 8 September 2012
एक छोटीशी प्रेमकथा
१५ वर्षापूर्वीची गोष्ट असेल. मी त्यावेळेला शाळेत होतो. शाळा सुटली की माझा क्लास असायाचा. शाळा सकाळची होती ७ ते १२ वाजेपर्यंत आणि क्लास ३ ते ५ वाजेपर्यंत. क्लास मधे माझ्या बाजूला एक देखणा मुलगा बसायचा. पहिल्या दिवसापासून तो माझ्या बाजूला बसत होता आणि चांगला मित्र पण झाला होता. आपण त्याला ह्या गोष्टी चा राजा म्हणुया.
आमच्या क्लास मधे आमच्या शाळेशिवाय ईतर मुले मुली पण असायचे. राजा पण दुसर्या शाळेतला होता. आम्ही क्लास मध्येच एकत्र भेटायचो. एकदम मनमोकळा स्वभावाचा. नेहमी हसरा चेहरा. एक साइड चा भांग पाडला कि दिसायला विनोद खन्ना होता. घरची परिस्थिती पण चांगली होते. त्यावेळेला सुद्धा आम्हा सर्वाना वडापाव, चॉकलेट घ्यायची त्याची ऐपत असायची. आमच्या खिशात त्यावेळेला चुकून माकून एखादे चार आणे मिळाले तर नशीब. पॉकेटमनी हा प्रकारच अस्तित्वात नव्ह्ता. पहिल्या दिवशी क्लास मधे आल्यापासून तो माझा चांगला मित्र झाला. क्लास सुटल्यावर पण आम्ही खूप धमाल करू. त्यावेळेला त्याच्या कडे सायकल होती. त्यावेळेला सायकल असणे म्हणजे आता कॉलेजात जाणार्या मुलाकडे मर्सिडीज असण्यासारखे होते. आम्ही डबल सीट बसायचो, अर्थात सायकल तोच चालवायचा. मला घराच्या मागच्या गल्लीत सोडायचा आणि निघून जायचा.

Subscribe to:
Comments (Atom)