Wednesday, 26 September 2012

विचारीन विचारीन म्हणतोय, पण धाडस होत नाही ...

ती समोरून आली तरीही शब्दाना बांध फुटत नाही ,
विचारीन विचारीन म्हणतोय, पण धाडस होत नाही ...
वर्षे लोटली तरी फ़क्त तिच्यावरच मरतोय ,
शप्पथ सांगतो फ़क्त तिचाच विचार करतोय ...
पेन मागण्याशिवाय कधी बोललो नाही ,
विचारीन विचारीन म्हणतोय, पण धाडस होत नाही ...
माहित नाही, ती मरते का नाही माझ्यावर?
का तीचं ह्रदय आहेफ़क्त एक "सजीव कलेवर" ?
चांदण्यात फिरण्याचा आनंद आम्हालाही मिळणार की नाही ?
विचारीन विचारीन म्हणतोय, पण धाडस होत नाही ...
Valentine Day ला बूके घ्यायला जातोय ,
खिशाचा विचार करून फुलावरच भागवतोय ,
या "गरिबाच प्रेम" ती स्वीकारणार की नाही ?
विचारीन विचारीन म्हणतोय, पण धाडस होत नाही ...
तिच्यासाठी घेतलेल फुल वहितच कोमेजतय ,
माझ काळीज मात्र तिचीच आस धरतय ...
कितीही ठरवून गेलो तरी, ह्रदय मात्र बोलत नाही ,
विचारीन विचारीन म्हणतोय, पण धाडस होत नाही ...
वाटतय, तिच्याही वहित असेल एखादं फुल माझ्यासाठी ,
का आहे ही भोळी समज या वेड्या मनासाठी ?
आयुष्यातल पहिल - वहिल प्रेम मिळणार की नाही ?
विचारीन विचारीन म्हणतोय, पण धाडस होत नाही ...

No comments:

Post a Comment